Subscribe RSS


॥ गणपती बाप्पा मोरया ॥

सकल विद्येची देवता, बुद्धीचा दाता, असा विश्व्वविनायक गजानन गणपती. श्रावण सपताच कोकणात सार्‍याना वेध लागतात ते गणेश चतुर्थदशीचे सर्वत्र तयारी होते ती गणरायाच्या स्वागताची . कोणी रंग रंगोटी करतो तर कोणी आरास करण्यात मग्न असतो. काही ठिकाणी फ़ुलाचा आरास असतो तर काही मकराचा , कोणी खरेदित व्यस्त असतात तर काहि टाळ , मृदंग, तबला , ढोलकी तयार करण्य़ात. लहानापासुन थोरापर्यत सर्व आपापल्या परिने गणरायाच्या तयारीत व्यस्त असतात.
कोकणात सर्वत्र धुम असते ती भगवान लोकरे व त्यांनी गायलेल्या गाण्यांची. कुठे "नारायणी नमोस्तुते" ऎकायला येते तर कुठे
यारे नाचु वाळवंटी" ,"भक्ताचिया गावा आला" या कॅसेट व सि.डि. कोकणात मालवण पासुन ते थेट मुंबई पर्यत गणरायाच्या रांगात रंगुन जातात.
बाप्पाचे गजर , अभंग, भजनात सारे दिन रात मग्न असतात.
या वर्षी भगवान लोकरे बुवाची या वर्षी "रत्नागिरी हापुस देवगड हापुस" ही कॅसेट व सि.डि. सध्या बाजारात आली आहे. बुवा श्री श्रीधर मुणगेकर याच्या गाण्यांबरोबर डबलबारीत धमाल गजर, अभंग, गौळणी गायल्या आहेत. या कॅसेट व सि.डि. विशेष म्हणजे यातील गजर, अभंग, गौळणी. य़ा स्वतः भगवान लोकरे त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.

0 comments to “॥ गणपती बाप्पा मोरया ॥”