Subscribe RSS


गणपती गणराज धुन्दिराज महाराज । मोरेश्वर चिंतामणी


अशी अनेक नावे असणारा गणपतीची ओढ श्रावण चालु होताच सर्व चाकरमान्याना लागते. मुख्य कारण असता गावाक गणपतीक जावचा. वर्षासुन एकदा बाप्पा घरी येतत, आनंदात १० दिवस असतत. सर्व कसा कोकण आनंदाने फ़ुललेला असता. जो तो बाप्पाची मनोभावे पुजा करुसाठी २ दिवस का नाय व्ह्यना गावाक जाता.

आमचे गुरुवर्य कोकण कला भूषण श्री चंद्रकांत कदम यांची आठवण कायम येत असता. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केल्यानी. आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली. मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले. कलानुसार भजनात त्यानी भजनात बादल करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

त्यांचे अनेक शिष्यगणांनी दिलेले ज्ञानाचा वारसा पुढे चालवण्याचे काम करत आहेत. य़ात गुरुवर्य कोकण कला भूषण श्री भगवान लोकरे, श्री लक्ष्मण गुरव, श्री कशिराम परब हे असत. य़ा सर्वानी मिळुन जणुकाय त्यांना जिवंतच ठेवले आहे. आज संख्य त्यांचे शिष्यगण आहेत या महाराष्ट्रभर आणी कोकणात.
गुरुवर्य कोकण कला भूषण श्री चंद्रकांत कदम बुवाची अनेक गाणी आजपण कोकणवासियाच्या स्मरणात आसत. ते आपल्या एका गाण्यावर लोकासी तासनतास वेड लावत. श्रोतेपण आवडीने एकत असत. त्याचे अभंग, भारुड अप्रतिमच आसत. प्रत्येक ओळीचे ते विश्लेषण देत. त्याचे गजर हे नेहमी समाजास उपदेशक असतात. दाजिबा चालीवरच्या गजराने " बाप्पा मोरयाला" ही नाचवले.

ते आज जर आसते तर आमचे जीवन पावन झाले असते. गुरुदासास आमचा त्रिवार मुजरा.