Subscribe RSS


कोकण कला भूषण ही पदवी सर्व प्रथम श्री चंद्रकांत कदम त्यांस देण्यात आली. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केली.आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली.मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले.
भजन क्षेत्रात त्यांनी अनेक नव्या सुधरणा केल्या. त्यांचे भजन म्हटले की त्याचे असंख्य असे श्रोते जमा ह्यायचे . नवनवीन गाण्याच्या चाली व अर्थपुर्ण अशी गाणी हे त्यांचे विशेष. त्यांचे अभंग हे विशेष अर्थपुर्ण असायचे. ते गात असताना अभंगाचे अर्थ व त्याचे विश्लेषण करुण सांगायचे. त्यांनी अनेक गाणी रचली .त्यांच्या अनेक कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. यापैकी "बाप्पा मोरया" ही कॅसेट खुप प्रसिद्ध आहे .
आज महाराष्ट्रात त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आहेत. यापैकी "कोकण कला भूषण- भगवान लोकरे" हे एक आहेत. पण त्यांचे सर्वात आवडते शिष्य म्हणजे "लक्ष्मण गुरव".गुरुच्या स्वर्गवासानतर ही ते आज ही मनापासुन सेवा करत आहेत . असेच कशिराम परब हे ही आज कदम बुवाचा वरसा पुढे चलवत आहेत.
आज ही श्री चंद्रकांत कदम त्यांचे नाव घेतले कि, आठवण येते ती पर्शुराम पांचाळ, विलास पाटील , वामन खोपकर अशा अनेक बुवाची.
आज ही लोक कदम बुवाची गाणी आवडीने ऎकतात.

0 comments to “कोकण कला भूषण-श्री चंद्रकांत कदम”