Subscribe RSS


कोकण कला भूषण ही पदवी सर्व प्रथम श्री चंद्रकांत कदम त्यांस देण्यात आली. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केली.आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली.मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले.
भजन क्षेत्रात त्यांनी अनेक नव्या सुधरणा केल्या. त्यांचे भजन म्हटले की त्याचे असंख्य असे श्रोते जमा ह्यायचे . नवनवीन गाण्याच्या चाली व अर्थपुर्ण अशी गाणी हे त्यांचे विशेष. त्यांचे अभंग हे विशेष अर्थपुर्ण असायचे. ते गात असताना अभंगाचे अर्थ व त्याचे विश्लेषण करुण सांगायचे. त्यांनी अनेक गाणी रचली .त्यांच्या अनेक कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. यापैकी "बाप्पा मोरया" ही कॅसेट खुप प्रसिद्ध आहे .
आज महाराष्ट्रात त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आहेत. यापैकी "कोकण कला भूषण- भगवान लोकरे" हे एक आहेत. पण त्यांचे सर्वात आवडते शिष्य म्हणजे "लक्ष्मण गुरव".गुरुच्या स्वर्गवासानतर ही ते आज ही मनापासुन सेवा करत आहेत . असेच कशिराम परब हे ही आज कदम बुवाचा वरसा पुढे चलवत आहेत.
आज ही श्री चंद्रकांत कदम त्यांचे नाव घेतले कि, आठवण येते ती पर्शुराम पांचाळ, विलास पाटील , वामन खोपकर अशा अनेक बुवाची.
आज ही लोक कदम बुवाची गाणी आवडीने ऎकतात.

"कोकण कला भूषण "ही विशेष पदवी भगवान लोकरे त्यांस त्यांच्या भजनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आली आहे.
भगवान लोकरे त्यांनी या माध्यमातुन कोकणची मागील ४० वर्षे अविरत सेवा केली व करत आहे. आपल्या सुस्वर आवाजाने त्यांनी रसिकांना मने जिंकली आहेत.
त्यांच्या "नारायणी नमोस्तुते" ,"यारे नाचु वाळवंटी" ,"भक्ताचिया गावा आला"या कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. त्यांच्या ही कला विशेष वाखाण्याजोगी आहे. "कोकण कला भूषण"श्री चंद्रकांत कदम व संगीतरत्न श्री प्रमोद दीक्षित हे त्यांचे गुरु. दोघे ही संगीताचे उत्तम जाणकार. दोघअकडुन त्यांनी संगीताचे धडे गिरवले.
या ४० वर्षे इतिहासात त्यास उत्तम अशी साथ दिली ती श्री. श्रीधर मुणगेकर , श्री. रामदास कासले, श्री. प्रमोद हर्याण या सरख्या अनेक कोकण सुपुत्रानी. या बुवा बरोबर त्यानी अनेक डबलबारी केल्या. अनेक ठिकाणी त्यानी गाजवलीत. आज ही लोक
वाट पाह्तात ती भगवान लोकरे याच्या नवनविन गाण्याची .
या ४० वर्षे इतिहासात त्यास उत्तम अशी साथ दिली ती त्याच्या श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व रत्नागिरी पूर्णगड. यात श्री दादा सावंत, श्री कृष्णा लाड ,
इ. अनेक जणाचा सहयोग लाभला. त्यास पखवाजाची साथ दिली ती श्री बाळू थोरवे श्री रवींद्र जुवाटकर , श्रीदिनकर भगत . श्री विजय सावंत , श्री प्रदीप डोर्लेकर इ.
कोरस लाभला तो श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, भांडुप त्यांच्या श्री.दिलीप पाटणकर , नाटॆकर, मुकेश ,चेतन, रतन लोकरे ,विक्रम कोयन्डे , रोशन ढवण, चंदू जाधव , इ. यानी .आपल्या या कोरसच्या साथीने त्यानी अनेक स्प्रर्धेतील चषकावर आपले नाव कोरले आहे.
बुवा श्री भगवान लोकरे त्यांनी अनेक शिष्य घडवले व आज त्यांचा ते वरसा महाराष्ट्र व कोकणात चालवत आहेत.या मध्ये बुवा श्री दिलिप पाटणकर ,बुवा कै श्री अरुण सावत ,बुवा श्री अजय भोवड, बुवा श्री नितिन साटम.
आता गणपति आला की त्याच्या गांण्य़ाची सी.डी घराघरात पहाण्यास मिळतात.
कोकणात तर त्याची प्रत्येक चाहत्याच्या तोंडात ऎंकावयास मिळते.

Locations of visitors to this page