Subscribe RSS


'जांभूळ आख्यान' संपले
महाराष्ट्राचे लोकशाहीर विठ्ठल उमप याचं आज नगपुर इथे निधन झालं. उमप यांचा नागपुरात जाहीर कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर चक्कर आली व ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आला. आणि त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या समोर जगचा निरोप घेतला. लोकशाहीर विठ्ठल हे ८० वर्षांचे होते. लोककला, अभिनय क्षेत्रात शाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.

शाहीर विठ्ठल उमप यांना संगीत-नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दलित समाजात जन्माला आलेल्या विठ्ठल उमपांनी आयुष्यभर जीवनाशी उघड संघर्ष केला. अनेक कडू अनुभव गाठीशी बांधले. पण त्याची छाया आपल्या कलेवर पडू दिली नाही. वयाच्या ऐंशीव्या वर्षी जांभूळ आख्यान सादर करताना उमपांचा उत्साह, जोश वीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच असायचा. अफाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर त्यांनी जांभूळ आख्यानाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करुन सोडलं.

वयाच्या आठव्या वर्षी गायनाला सुरवात करणाऱ्या उमपांनी लोककला, अभिनय, गायन, रंगभूमी, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात चतुरस्त्र संचार केला. आकाशवाणीवर तब्बल 45 वर्षे ते गायले. वयाच्या आठव्या वर्षीपासुन ते ८० व्या वर्षीपर्यत सतत लोककलेची सेवा केली.

कामगार कल्याणच्या व्यसनमुक्ती, सामाजिक जागृतीच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी 30 वर्षे योगदान दिलं. त्यांची जवळपास एक हजाराहून अधिक ध्वनीमुद्रित गाणी उपलब्ध आहेत.

फू बाई फू या गाण्याने महाराष्ट्राला अक्षरश: वेड करुन सोडलं. कोळी नसूनही ये दादा आवर ये या कोळीगीताला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. आंतरराष्ट्रीय महोत्सवातही आपल्या कलागुणांच्या जोरावर त्यांनी आपली छाप उमवटली. जाम्बुळ आख्यान हे त्याचे गाजलेले नाटक आहे.

शाहीरी कार्यक्रम असोत की आंबेडकरी जलसे आपल्या बुलंद आवाजाने ते लोकांच्या थेट हदयात पोहचत असत. आयुष्याची उमेदीची वर्षे दारिद्र्यात घालवूनही लोककलेला समृध्द करणारा हा हाडाचा कलावंत चिरकाल रसिकांच्या मनात घर करुन राहिल.