Subscribe RSS



गजर टाळ मृदुंगाचा भजन  स्पर्धा TV- 9 

Category: | 0 Comments

कोकण कला भूषण - गुरुवर्य कोकण कला भूषण श्री चंद्रकांत कदम


गणपती गणराज धुन्दिराज महाराज । मोरेश्वर चिंतामणी


अशी अनेक नावे असणारा गणपतीची ओढ श्रावण चालु होताच सर्व चाकरमान्याना लागते. मुख्य कारण असता गावाक गणपतीक जावचा. वर्षासुन एकदा बाप्पा घरी येतत, आनंदात १० दिवस असतत. सर्व कसा कोकण आनंदाने फ़ुललेला असता. जो तो बाप्पाची मनोभावे पुजा करुसाठी २ दिवस का नाय व्ह्यना गावाक जाता.

आमचे गुरुवर्य कोकण कला भूषण श्री चंद्रकांत कदम यांची आठवण कायम येत असता. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केल्यानी. आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली. मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले. कलानुसार भजनात त्यानी भजनात बादल करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

त्यांचे अनेक शिष्यगणांनी दिलेले ज्ञानाचा वारसा पुढे चालवण्याचे काम करत आहेत. य़ात गुरुवर्य कोकण कला भूषण श्री भगवान लोकरे, श्री लक्ष्मण गुरव, श्री कशिराम परब हे असत. य़ा सर्वानी मिळुन जणुकाय त्यांना जिवंतच ठेवले आहे. आज संख्य त्यांचे शिष्यगण आहेत या महाराष्ट्रभर आणी कोकणात.
गुरुवर्य कोकण कला भूषण श्री चंद्रकांत कदम बुवाची अनेक गाणी आजपण कोकणवासियाच्या स्मरणात आसत. ते आपल्या एका गाण्यावर लोकासी तासनतास वेड लावत. श्रोतेपण आवडीने एकत असत. त्याचे अभंग, भारुड अप्रतिमच आसत. प्रत्येक ओळीचे ते विश्लेषण देत. त्याचे गजर हे नेहमी समाजास उपदेशक असतात. दाजिबा चालीवरच्या गजराने " बाप्पा मोरयाला" ही नाचवले.

ते आज जर आसते तर आमचे जीवन पावन झाले असते. गुरुदासास आमचा त्रिवार मुजरा.



कोकणातील उत्तम व दर्जेदार आंबे मिळण्य़ाचे ऎकमेव ठिकाण म्हणजे फाळके ब्रदर्स.

आम्ही मागील १५ वर्षा पासुन हापूस आंब्याचे उत्पादन तसेच विक्रि करत आहोत. य़ा क्षेत्रात आम्हाला १५ वर्षाचा दांडगा अनुभव आहे. आम्ही फक्त नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे उत्पादन घेतो व तसेच ते पीकवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा उपयोग करतो.


आमच्या येथे सर्व जातीचे आंबे मिळतील. य़ात देवगड हापूस , रत्नागिरी हापूस, अलीबाग हापूस तसेच गुजरातचे ही वेगवेगळ्य़ा जतिचे आंबे उपल्ब्ध होतील. या व्यतिरिक्त राजापूरी , केसर, तोतापुरी इ. जतिचे आंबे मिळतील.


संपर्क :
दिनेश फाळके
९४२२९९८२२५
९८७०३५३१७७
email at : girish.phalke619@gmail.com


'जांभूळ आख्यान' संपले
महाराष्ट्राचे लोकशाहीर विठ्ठल उमप याचं आज नगपुर इथे निधन झालं. उमप यांचा नागपुरात जाहीर कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर चक्कर आली व ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आला. आणि त्यांनी हजारो प्रेक्षकांच्या समोर जगचा निरोप घेतला. लोकशाहीर विठ्ठल हे ८० वर्षांचे होते. लोककला, अभिनय क्षेत्रात शाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.

शाहीर विठ्ठल उमप यांना संगीत-नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

दलित समाजात जन्माला आलेल्या विठ्ठल उमपांनी आयुष्यभर जीवनाशी उघड संघर्ष केला. अनेक कडू अनुभव गाठीशी बांधले. पण त्याची छाया आपल्या कलेवर पडू दिली नाही. वयाच्या ऐंशीव्या वर्षी जांभूळ आख्यान सादर करताना उमपांचा उत्साह, जोश वीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच असायचा. अफाट निरीक्षणशक्तीच्या जोरावर त्यांनी जांभूळ आख्यानाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करुन सोडलं.

वयाच्या आठव्या वर्षी गायनाला सुरवात करणाऱ्या उमपांनी लोककला, अभिनय, गायन, रंगभूमी, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात चतुरस्त्र संचार केला. आकाशवाणीवर तब्बल 45 वर्षे ते गायले. वयाच्या आठव्या वर्षीपासुन ते ८० व्या वर्षीपर्यत सतत लोककलेची सेवा केली.

कामगार कल्याणच्या व्यसनमुक्ती, सामाजिक जागृतीच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी 30 वर्षे योगदान दिलं. त्यांची जवळपास एक हजाराहून अधिक ध्वनीमुद्रित गाणी उपलब्ध आहेत.

फू बाई फू या गाण्याने महाराष्ट्राला अक्षरश: वेड करुन सोडलं. कोळी नसूनही ये दादा आवर ये या कोळीगीताला एका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. आंतरराष्ट्रीय महोत्सवातही आपल्या कलागुणांच्या जोरावर त्यांनी आपली छाप उमवटली. जाम्बुळ आख्यान हे त्याचे गाजलेले नाटक आहे.

शाहीरी कार्यक्रम असोत की आंबेडकरी जलसे आपल्या बुलंद आवाजाने ते लोकांच्या थेट हदयात पोहचत असत. आयुष्याची उमेदीची वर्षे दारिद्र्यात घालवूनही लोककलेला समृध्द करणारा हा हाडाचा कलावंत चिरकाल रसिकांच्या मनात घर करुन राहिल.


॥ गणपती बाप्पा मोरया ॥

सकल विद्येची देवता, बुद्धीचा दाता, असा विश्व्वविनायक गजानन गणपती. श्रावण सपताच कोकणात सार्‍याना वेध लागतात ते गणेश चतुर्थदशीचे सर्वत्र तयारी होते ती गणरायाच्या स्वागताची . कोणी रंग रंगोटी करतो तर कोणी आरास करण्यात मग्न असतो. काही ठिकाणी फ़ुलाचा आरास असतो तर काही मकराचा , कोणी खरेदित व्यस्त असतात तर काहि टाळ , मृदंग, तबला , ढोलकी तयार करण्य़ात. लहानापासुन थोरापर्यत सर्व आपापल्या परिने गणरायाच्या तयारीत व्यस्त असतात.
कोकणात सर्वत्र धुम असते ती भगवान लोकरे व त्यांनी गायलेल्या गाण्यांची. कुठे "नारायणी नमोस्तुते" ऎकायला येते तर कुठे
यारे नाचु वाळवंटी" ,"भक्ताचिया गावा आला" या कॅसेट व सि.डि. कोकणात मालवण पासुन ते थेट मुंबई पर्यत गणरायाच्या रांगात रंगुन जातात.
बाप्पाचे गजर , अभंग, भजनात सारे दिन रात मग्न असतात.
या वर्षी भगवान लोकरे बुवाची या वर्षी "रत्नागिरी हापुस देवगड हापुस" ही कॅसेट व सि.डि. सध्या बाजारात आली आहे. बुवा श्री श्रीधर मुणगेकर याच्या गाण्यांबरोबर डबलबारीत धमाल गजर, अभंग, गौळणी गायल्या आहेत. या कॅसेट व सि.डि. विशेष म्हणजे यातील गजर, अभंग, गौळणी. य़ा स्वतः भगवान लोकरे त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.


कोकण कला भूषण ही पदवी सर्व प्रथम श्री चंद्रकांत कदम त्यांस देण्यात आली. आपल्या वयाच्या १६ व्या वर्षा पासुन त्यांनी डबलबारीस सुरवात केली.आपल्या भारदस्त व जबरदस्त आवाजाने त्यांनी रसिकांची मने जिंकली.मुळ्चे ते देवगड आरे या गावाचे. त्यांनी लहानपणापासुन भजानाचे धडे घेतले.
भजन क्षेत्रात त्यांनी अनेक नव्या सुधरणा केल्या. त्यांचे भजन म्हटले की त्याचे असंख्य असे श्रोते जमा ह्यायचे . नवनवीन गाण्याच्या चाली व अर्थपुर्ण अशी गाणी हे त्यांचे विशेष. त्यांचे अभंग हे विशेष अर्थपुर्ण असायचे. ते गात असताना अभंगाचे अर्थ व त्याचे विश्लेषण करुण सांगायचे. त्यांनी अनेक गाणी रचली .त्यांच्या अनेक कॅसेट व सि.डि खुप लोकप्रिय आहेत. यापैकी "बाप्पा मोरया" ही कॅसेट खुप प्रसिद्ध आहे .
आज महाराष्ट्रात त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आहेत. यापैकी "कोकण कला भूषण- भगवान लोकरे" हे एक आहेत. पण त्यांचे सर्वात आवडते शिष्य म्हणजे "लक्ष्मण गुरव".गुरुच्या स्वर्गवासानतर ही ते आज ही मनापासुन सेवा करत आहेत . असेच कशिराम परब हे ही आज कदम बुवाचा वरसा पुढे चलवत आहेत.
आज ही श्री चंद्रकांत कदम त्यांचे नाव घेतले कि, आठवण येते ती पर्शुराम पांचाळ, विलास पाटील , वामन खोपकर अशा अनेक बुवाची.
आज ही लोक कदम बुवाची गाणी आवडीने ऎकतात.